प्रतिनिधी : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सन्माननीय संदीप शुक्लाजी खजिनदार मुंबई प्रदेश अध्यक्ष यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे सायन,प्रतीक्षा नगर,प्रभाग क्रमांक 173 मधील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ पर्यावरण पूरक तुळशी आणि लाडू पाकिटाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याचे आयोजन/ नियोजन श्री.संतोष कांबळे यांनी केले असून सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन श्री.तानाजी घाग समाजसेवक/पर्यावरण मित्र यांनी खुमासदार शैलीत केले.यावेळी श्री संदीप शुक्ला यांच्यासह सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शाल तुळशी रोप देऊन सन्मानित केले गेले.
आषाढी एकादशी निमित्त प्रतीक्षा नगर मध्ये पर्यावरणपूरक तुळशीवाटप संपन्न
RELATED ARTICLES