Friday, July 4, 2025
घरमहाराष्ट्र१० जुलै'ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

१० जुलै’ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

प्रतिनिधी : पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे.

गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदानाजवळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदय व रक्तदाब तपासणी , मधुमेह (शुगर) तपासणी ,रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी ,संपूर्ण वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला, तपासणीनंतर मोफत औषध वाटप इत्यादी सेवा निःशुल्क दिल्या जाणार आहेत.

या शिबिरात वोखार्ड हॉस्पीटल या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व तज्ज्ञांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमामागे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सुरळीत राहावे, हीच भावना आहे.

“आरोग्य हेच खरे धन आहे.” या उक्तीला अनुसरून या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments