Thursday, July 3, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही पदे मागासवर्गीयांसाठी राखीव करा _ राष्ट्रीय चर्मकार...

राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही पदे मागासवर्गीयांसाठी राखीव करा _ राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुख्य नेते बाबुराव माने यांची जोरदार मागणी

प्रतिनिधी : देशात काही अपवाद सोडले तर राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री ही पदे मागासवर्गीय समाजाला मिळालेली नाहीत.यासाठी ही खुल्या गटातील पदे मागासवर्गीयांसाठी ठराविक अंतराने राखीव ठेवली पाहिजेत,अशी परखड मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी केली.
राष्ट्रीय चर्मकार संघाचे देशभरातील पदाधिकारी,नेते यांची एक संवाद परिषद धारावीमधील मनोहर जोशी महाविद्यालयात नुकतीच आयोजित केली होती त्यावेळेस माने हे मार्गदर्शन करताना बोलत होते.
बाबुराव माने म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली. किती वेळा आपला मुख्यमंत्री झाला.किती वेळा आपला राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल झाले.म्हणून ही पदे ठराविक अंतराने राखीव केली पाहिजेत.तरच पाच,दहा वर्षांनी आपला नंबर लागेल.महाराष्ट्रात आपल्या समाजाचे सुशीलकुमार शिंदे यांना एकदा फक्त मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली
होती.तीही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६०\६५ वर्षांनी.म्हणूनच ही पदे राखीव ठेवली पाहिजे.
आपल्या मागासवर्गीय समाजाला ग्रामपंचायतीत सरपंचपद, पालिकेत कुठे महापौरपद तर कुठे पंचायत समितीचे अध्यक्षपद. मात्र राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री ही मोठी पदे खुली ठेवली आहेत,असे स्पष्ट करुन माने पुढे म्हणाले हजारो वर्षे ज्यांनी आपल्याला पुस्तके उघडू दिली नाहीत.शेकडो वर्षे ज्यांनी आपले हातपाय बांधून टाकले.आणि मोठ्या पदापर्यंत आपल्याला जाऊ दिले नाही.म्हणून पंतप्रधानपदासह सर्व मोठी पदे राखीव ठेवली पाहिजेत. तरच आपल्या समाजातील लायक लोकांना रिझर्व्हेशन आरक्षणाच्या आधारे ५\ १० वर्षांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ठराविक अंतराने बसण्याची संधी मिळेल. यासाठी चर्मकार समाजाची ताकद खऱ्या अर्थाने उभी राहिली तर या गोष्टी सुध्दा अशक्य नाहीत,असा दुर्दम्य आशावाद माने यांनी व्यक्त केला.
जी मोक्याची क्रिम पदे आहेत ती दुर्देवाने राखीव नाहीत.पण महापौर, सरपंच, पंचायत समिती,जि.प. अध्यक्ष ही छोटी छोटी पदे आरक्षण देऊन मागासवर्गीय समाजाचे आपण फार मोठे कल्याण केले आहे अशा आविर्भावात राज्यकर्ते वावरत आहेत,अशी टीकाही माने यांनी केली.
आपल्या चर्मकार समाजाच्या छोट्या छोट्या संस्था,संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करीत असून या सर्व संस्थांनी,संघटनांनी एकजूट दाखवली पाहिजे.आपल्या चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाही.त्यावेळेवर मिळवण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे,असे आवाहनही बाबुराव माने यांनी चर्मकार समाजाचे नेते पदाधिकाऱ्यांना या संवाद परिषदेत बोलताना केले.
बोध्द समाज ज्यावेळेस लढतो त्यावेळी बौद्ध बांधव आपल्या बायका मुलांबाळांसह रस्त्यावर उतरतो. ते पोलिसांच्या लाठ्या,काठ्या खातात,१५\२० दिवस कोठडीत राहतात.तरीही ही माणसे आपल्या अस्मितेशी तडजोड करीत नाहीत, अशा शब्दात बाबुराव माने यांनी बौध्द आंदोलकांची तारीफ करुन चर्मकार बांधवांनी सुध्दा आपल्या अस्मितेसाठी तडजोड करता कामा नये असे सांगितले.महापुरुषांच्या मानवतावादी,समतावादी विचारांचा विसर पडला
महापुरुषांच्या विचारधारेचा विसर पडत चालला आहे.याचे एकमेव कारण म्हणजे चांगल्या विचारांचा सुसंवाद कुठे होताना दिसत नाही.यामुळे सध्या सामाजिक दिशा बदलून समाजाची दशा बिघडत चालली आहे.समाजाची अस्मिता, अस्तित्व, अखंडता कायम राहून एकसंघ समाज निर्माण व्हावा.असा व्यापक तथा उदात्त हेतु हा विचार या संवाद परिषदेचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी मांडला.यानंतर दिवसभर चाललेल्या या संवाद परिषदेची सांगता स्नेहभोजनाने झाली.
याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी,मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर, महिला प्रदेशाध्यक्षा शारदाताई नवले, रामभाऊ कदम, विजय घासे,
शाहीर संभाजी भगत,अशोकराव आगवणे, वसंत धाडवे, विठ्ठल व्हनमोरे, अ‍ॅडव्होकेट नारायण गायकवाड, डॉ. सुधीर मेढेकर (डीन कुपर हॉस्पिटल),गौतम कारंडे सेवानिवृत्त(डी. एस. पी), अशोक सूर्यवंशी, मच्छीगर समाजाचे अ‍ॅडव्होकेट सिद्धनाथ हातरकर, जैसवार समाजाचे दिपचंद जैसवार रेगर समाजाचे हंसराज रेगर आदींसह महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले चर्मकार समाजाचे नेते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चर्मकार समाजाच्या जाती-पोट जातींच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन आपले हक्क अधिकार, आपल्या समाजाचा फंड निधी हा इतर योजनांकडे वळविला जातो तो आपल्याला कसा मिळेल यावर चर्चा केली. चर्मउद्योग मंडळाचा कर्ज रद्द करण्याबद्दल आणि जातीच्या दाखल्या मिळविण्यात संदर्भात येणाऱ्या अडचणींवरही सर्व नेत्यांनी समाजाला यावेळेस मार्गदर्शन केले.बाबुराव माने यांच्यावरील कवितेची फोटो फ्रेम
कवी,गीतकार विलास देवळेकर यांनी बाबुराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी लिहिलेली एक कवितेची फोटो फ्रेम आणि संत रविदासांची फोटो फ्रेम आणि गमज्या त्यांना भेट देण्यात आले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments