प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आज दिनांक १ मे रोजी ६५ वा महाराष्ट्र दिन छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर विभागातील क्रिडांगणाच्या पटांगणावर मोठ्या आनंदी वातावरणात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सुरुवातीला सकाळी ७.०० छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी झेंडावंदन तसेच पोलिस दलाच्या वतीने परेड घेण्यात आली.
त्यानंतर सका. ९.०० च्या दरम्यान क्रिडा भवन येथे मा.राज्यापाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गौरव गीते बृहन्मुंबई महानगरपालिका संगीत कला अकादमी च्या वतीने सादर करण्यात आली या सुमधुर आवाजातील संगीत, गाणी ऐकता ऐकता उपस्थितांनी सकाळच्या नास्टयाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, तसेच श्रीम.आश्विनी जोशी, उपायुक्त प्रशांत सपकाळे,जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री
अजितकुमार आंबी आदी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुनियोजन करुन विभागातील कामगार, कर्मचारी अधिकारी वरिष्ठांच्या कौतूकास पात्र ठरले आहेत,
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त सन्माननीय भुषण गगराणी यांनी महाराष्ट्र गौरव गीत गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले तद्वतच उपस्थितांनी भुवया उंचावून आयुक्त साहेब सुध्दा गित गात आहेत याचे आश्चर्य व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने घकव्य खात्यातील कामगार कर्मचारी अधिकारी तसेच स्वच्छता दूत मार्शल तसेच एनजीओ उपस्थित होते.
शेवटी राष्ट्रगीत गाऊन तसेच मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र शासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका च्या वतीने ६५ वा महाराष्ट्र दिन आनंदी वातावरणात संपन्न!
RELATED ARTICLES