Friday, July 4, 2025
घरमहाराष्ट्रराज ठाकरे हेच मराठी माणसाचे आधारस्तंभ आहेत !

राज ठाकरे हेच मराठी माणसाचे आधारस्तंभ आहेत !

विशेष लेख (डॉ.शांताराम कारंडे) : राजकारणात सक्रिय असणारे अनेक नेते मी पाहिलेत. स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा बळी घेणारे, चौकश्या वाचविण्यासाठी इमान विकणारे, जेल मध्ये जायच्या भीतीने पक्ष बदलणारे, वाईट मार्गाने कमावलेला पैसा वाचविण्यासाठी गद्दारी करणारे, ज्याच्या जिवावर मोठे झाले त्याच्याच उरावर पाय ठेऊन पक्ष हडपणारे आणि जिवाला घाबरून सत्ता मिळवणारे असे अनेक प्रकारचे नेते लहानपणापासून पाहत आलोय. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मुघलांना शोभेल अशी वर्तणुक करणारे ढोंगी राजकारणी पाच पन्नास नव्हे तर शेकडो आपल्या अवतीभवती वावरत आहेत. मात्र त्यामधील ठाकरे ब्रँड हा वेगळा आहे. आणि त्यातून राज ठाकरे हे एकमेवाद्वितीय !

राज ठाकरे हे जरी रागात बोलले, आक्रमकपणे वागले तरी ते नेहमीच योग्य आणि एक घाव दोन तुकडे ! राज ठाकरे यांनी नेहमीच सत्याचा आग्रह धरलेला आम्ही नुसते पाहिलेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. ज्यांनी देशहितासाठी सर्वात आधी स्वतः च्या प्रतिमेचा विचार न करता प्रॅक्टिकल भूमिका मांडली. भारत – पाकिस्तान युद्धाच्या काळातही त्यांनी ठामपणे सांगितलं, “दहशतवादाचं उत्तर युद्ध नाही!”
त्यानंतर काही दिवसांतच जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली, तेव्हा पुन्हा एकदा राज ठाकरे योग्यच होते हे सिद्ध झाले. जेव्हा राज ठाकरे यांनी युद्धाऐवजी शांतता आणि कूटनीतीवर भर दिला, तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. “युद्ध हवं, आक्रमक व्हा!” असं म्हणणारे तथाकथित तज्ज्ञ आणि लेखक त्यांच्यावर तुटून पडले. पण आज, जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता शांततेचा मार्ग स्वीकारत शस्त्रसंधीची वाट पाहत आहे, तेव्हा तीच टीकाकार मंडळी तोंडावर आपटली. कारण राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही वैचारिक प्रगल्भतेची, अनुभवांची, देशहिताची, तर्कशुद्ध आणि दूरदृष्टीची होती !
राज ठाकरे यांनी नेहमीच भारतीय सैन्यांच्या शौर्याचा, धाडसाचा व बहादुरीचा सन्मानच केला आहे. पोलिसांवर तर त्यांचा खूप विश्वास आहे. तीनही दले, पोलीस यांना जर मोकळीक दिली आणि अधिकार दिले तर निश्चितच ते लपलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना शोधून काढतील हे ठामपणे सांगितले. हे सर्व प्रसार माध्यमांना सांगताना त्यांनी ‘युद्धाने फक्त विनाश होतो’, हे आवर्जून व ठणकावून सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली, पण युद्धाला पर्याय म्हणून कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा मार्ग देखील सुचवला. या समंजस व प्रगल्भ विचाराचे विरोधकांनी स्वागत करायचे सोडून त्यांना कमकुवत समजलं. पण शेवटी आज जगाने त्यांची दूरदृष्टी मान्य केली.
पाकिस्तान सोबत युद्ध सुरू होते तेव्हा भारताने दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले हे निश्चितच अभिमानास्पद होते, मात्र युद्धाची आग जर पेटली असती, तर दोन्ही देशांना परमाणु युद्धाचा धोका होता. आणि हीच धोक्याची जाणीव राज ठाकरे यांनी वेळीच करून दिली. त्यांनी मोदी सरकारला अंतर्गत दहशतवादी शोधून काढण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करून त्या दहशतवाद्यांना न भुतो न भविष्यती अशी शिक्षा देण्याची मागणी केली आणि देशाला सामंजस्याची वाट दाखवली. आणि अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली व युद्धाचा धोका टळला ही वस्तुस्थिती आहे. आणि ती प्रत्येकाने मान्य करायलाच हवी.
आता जेव्हा महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची केल्याचा जी आर फडणवीस सरकारने काढला तेव्हा त्याचा भविष्यातील धोका ओळखून सर्वात आधी आक्रमक होऊन त्याला जोरदार विरोध फक्त राज ठाकरे यांनीच केला. जेव्हा अनेकांना जाग ही आली नव्हती तेव्हा हा मुद्दा आत्मियतेने फक्त राज ठाकरे यांनीच उचलून धरला. साक्षात त्या खात्याच्या मंत्र्याने राज साहेबांना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका सांगितली तरी मराठीच्या या कट्टर वाघाने त्यालाही त्याची जागा दाखविली.
माझ्या देशाच्या विरोधात कुणी जात असेल तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या मराठीला, महाराष्ट्राला कुणी धक्का लावत असेल तर मराठी म्हणून अंगावर जाईन अशा भूमिकेचे राज ठाकरे हे फक्त राजकिय नेते नसून, एक दिव्यदृष्टी आहेत ! जिथे इतर नेते भावनांच्या लाटेवर स्वार होतात, तिथे राज ठाकरे तर्क आणि सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात. अहो… मोर्चाची फक्त घोषणाच केली…. अजून मोर्चा झालाच नाही तरी या वाघाच्या डरकाळीने दिल्ली हादरली. जर मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यते असा झाला असता आणि हेच ओळखून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा होवू नये, राज ठाकरे सिद्ध होऊ नये म्हणून घाईघाईत काढलेला जी आर रद्द करण्याची नामुष्की फडणवीस सरकारने स्वतः वर ओढवून घेतली.
नुसत्या एकट्या राज ठाकरेची ही किमया…. आणि आता तर दुसरा पण ठाकरे जोडीला….. हा नुसता विचार करूनच भाजपाचे धाबे दणाणले. पायाखालची वाळू सरकली. ते दोन उप…. तर मराठी असून पण मराठी लोकांना भय्ये वाटू लागले. ठाकरे हे नुसते आडनाव नसून तो बाणा आहे. ठाकरे हाच ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वात सक्षम आहे. म्हणूनच, आज पुन्हा एकदा सिद्ध झालं – राज ठाकरे हेच समस्त मराठी माणसाचा आधारस्तंभ आहे.
Regards,

Dr.Shantaram Karande – 9820158885 / 8329812348
( Gen-Secretary MNS Maharashtra state )
Employed & Employment Cell .
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments