Saturday, July 5, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात कार्यालयाशेजारी पोलिस चौकीला दलदलीचा बंदोबस्त..

साताऱ्यात कार्यालयाशेजारी पोलिस चौकीला दलदलीचा बंदोबस्त..

सातारा(अजित जगताप) : संपूर्ण सातारा जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून होतो. त्याच कार्यालयात शेजारील पोलीस चौकी मध्ये सध्या दलदलीचाच बंदोबस्त दिसून येत आहे. यामुळे पोलिसांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या बाबत दुष्काळी भागातून आलेल्या नागरिकांनी माहिती दिली की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी अनेक संघटना व व्यक्तिगत प्रश्न घेऊन बरेच लोक आंदोलन करतात. पूर्वी आंदोलकांना सत्याग्रही म्हणत होते.आता आंदोलनाकाकडे फारच लक्ष दिले जात नाही. अशी टीका होऊ लागलेली आहे.
तरी फारसा गोंधळ होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कुणी करू नये. यासाठी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व त्यांना किमान आराम करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी पोलीस चौकी निर्माण झाली. सदर पोलीस चौकीला बरेच दिवस पिण्याच्या पाण्याची जोडणी लावली नव्हती. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या पोलीस चौकीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालय की सातारा जिल्हाधिकारी कार्यालय? यांच्या नावे बिल काढायचे याचा घोळ मिटत नव्हता. आखिर जागृत पत्रकार व एका पोलीस कर्मचाऱ्यांनी याला पाठपुरावा करून त्या ठिकाणी पाण्याची जोडणी लावून घेतली. आता या पोलीस चौकीच्या शेजारी दलदल झाली आहे . डास व मच्छरच्या त्रासामुळे त्या ठिकाणी थांबणे दुरापास्त झाले आहे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आंदोलकांना सुद्धा या मच्छरच्या त्रासाने आजारी पडावे लागले आहे. दलदलीत पाय ठेवल्याने काहींच्या पायाला त्वचारोगाने सुद्धा ग्रासले आहे. फुकटचे पार्किंग असल्यामुळे अनेक जण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःची वाहन पार्किंग करून इतर ठिकाणी भ्रमंती करत असतात. त्यामुळे शासकीय कामासाठी आलेल्या अधिकारी वर्ग व अभ्यागतांना वाहन लावण्या जागा मिळत नाही.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीच्या शेजारी तर बंदोबस्तातच वाहन पार्किंग सोयीचा असल्यामुळे अनेक जण त्याच ठिकाणी पार्किंग करतात. त्यामुळे इतरांना रस्त्याने चालणे सुद्धा अवघड होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल व सांड पाणी साचल्यामुळे दलदल निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात विदारक चित्र दिसते. वयोवृद्ध व महिला तसेच काही आंदोलक घसरून सुद्धा पडलेले आहेत. या कार्यालयाच्या शेजारीत सार्वजनिक बांधकाम विभाग ,सातारा पंचायत समितीचे बांधकाम विभाग आहे. पण हा पोलीस चौकी परिसराचा भाग बहुदा गडचिरोली किंवा चंद्रपूर हद्दीत येत असावा. त्यामुळे याकडे कुणाचे लक्ष नाही. अशी टीका टिपणी होऊ लागलेली आहे.
चार मंत्री, तीन खासदार, सहा आमदार व त्यांच्यासोबत बॉडीगार्ड कम ठेकेदार आणि अधिकारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक यांचे नियमित जिल्हाधिकारी कार्यालयात वर्दळ असते.
सातारा जिल्ह्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांना धार्मिक प्रश्न महत्त्वाचे वाटतात पण सर्वसमावेशक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी पुढे आलेली आहे. ही दल दल बुजवण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा लोक वर्गणीतून हे काम करावे लागेल. असे सुचित करण्यात आले आहे.

_____________________
फोटो सातारा जिल्हा अधिकारी कार्यालया प्रवेशद्वाराची पोलीस चौकीच्या शेजारी दल दल (छाया– अजित जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments