Thursday, July 3, 2025
घरमहाराष्ट्र"छत्र निजामपूर" नव्हे, आता "किल्ले रायगड ग्रामपंचायत" हवी!

“छत्र निजामपूर” नव्हे, आता “किल्ले रायगड ग्रामपंचायत” हवी!

रायगड : जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो ऐतिहासिक रायगड किल्ला आज ‘छत्र निजामपूर ग्रामपंचायत’ या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेला शोभा न लावणारी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांची भेट घेऊन ‘छत्र निजामपूर’ हे ग्रामपंचायतीचे नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ असे करण्याची अधिकृत मागणी निवेदनाद्वारे सादर केली आहे.

या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, पेरूचादांड, आदिवासीवाडी यांसारख्या अनेक ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे. छत्रपतींच्या राजधानीला तिचा गौरवशाली इतिहास सन्मान मिळावा, अशी भूमिका या मागणीमागे आहे.

या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन रायगडला पुन्हा ‘किल्ले रायगड’ या नावाने ओळख मिळावी, अशी नम्र विनंती मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments