मुंबई (शांताराम गुडेकर) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मूर्तवडे नं. २, कातळवाडी येथे गुरुवार, दि. २६ जून २०२५ रोजी “शिक्षण परिषद” पुष्प १, ही परिषद उत्साहात संपन्न झाली.या परिषदेचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मा.श्री.हरिश्चंद्र तांबे सर व मुख्याध्यापक मा.श्री. अनंत शिगवण सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वहाळ बीट विस्तार अधिकारी मा. श्रीमती वृषाली वासुदेव भुरण मॅडम यांनी भूषविले.
व्यासपिठावर केंद्रप्रमुख मा.श्री. गायकवाड सर,बीट मुख्याध्यापिका मा.श्रीमती खामकर मॅडम,केंद्र मुख्याध्यापक मा.श्री. काजरोळकर सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. हरिश्चंद्र तांबे सर, मुख्याध्यापक मा.श्री.अनंत शिवराम शिगवण सर, उपाध्यक्षा श्रीमती दिशा जोशी मॅडम, शिक्षणप्रेमी श्रीमती दिक्षा तांबे मॅडम,शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुप्रिया धामापुरकर मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या तसेच राजेश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि प्रार्थना व समूहगीताने झाली. प्रारंभिक मनोगत केन्द्रप्रमुख मा. श्री. गायकवाड सर यांनी व्यक्त केले, तसेच परिषदेला उपस्थित सर्व शिक्षकवृंदाना मा. श्रीमती वैशाली भुरण मॅडमनी मार्गदर्शन केले.विशेष मार्गदर्शन वक्त्यांमध्ये श्री.लाहिम सर,खांडोत्री शाळा यांनी नवीन अभ्यासक्रम, पायाभूत जीवन कौशल्य विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ. शेख मॅडम वहाळ शाळा यांनी इयत्ता पहिलीचे अध्ययन-अध्यापन मराठी व गणित यावर सादरीकरण के
ले, तसेच सौ. तेटांबे मॅडम आबिटगाव शाळा यांनी मासिक पाळी व्यवस्थापन व नियोजन या विषयावर अतिशय संवेदनशील आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.या निमित्त शाळेचे पटांगणात झाडे लावुन बागेचे सुशोभीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कोहळे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री मनोज खामकर सर यांनी केले.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शाळेच्या उपक्रमशीलतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.