Sunday, July 6, 2025
घरमहाराष्ट्रकौतेय प्रतिष्ठान तर्फे दुभाषी मैदानात केली स्वछता

कौतेय प्रतिष्ठान तर्फे दुभाषी मैदानात केली स्वछता

मुंबई (शांताराम गुडेकर) : विलेपार्ले पूर्व येथील वामन मंगेश दुभाषी मैदान येथे गेले अनेक शनिवार रविवार काही समाजकंटकांकडून मद्यसेवन केले जात असल्याचा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या.आज त्याठिकाणी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला. तेथील एकमेव सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी ह्यांच्याकडून तिथे होत असलेल्या सर्व गैरप्रकाराची माहिती घेतली.त्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन सदर गोष्टीची लेखी तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.पार्लेकर नागरिकांच्या सुरक्षेला ह्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो हे सुद्धा निदर्शनास आणून देण्यात आले. ह्यावेळी अध्यक्ष कौतेय देशपांडे. सौ डॉली देढीया -देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, चंद्रेश परमार, भरत मौर्य, चंद्रकांत सोळंकी, विजय शर्मा सदस्य उपस्थित होते. पार्लेकर दक्षतेसाठी तेथे उपस्थित अनेक पारलेकरांनी कौतेय प्रतिष्ठानचे कौतुक करुन आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments