कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने, येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी आणि जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील गोरगरीब, होतकरू व सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाच्या प्रवासात प्रोत्साहन देण्यात आले.
या प्रसंगी भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा. प्रविण साळुंखे (दत्ता भाऊ), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील, कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे, तसेच विविध गावांतील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांमध्ये मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे,, मनव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संताजी शेवाळे, महारुगडेवाडीचे सरपंच बाळकृष्ण माने, तंटामुक्ती अध्यक्ष जंहागिर शेख, कृष्णत कंळत्रे, साळशिरंबेचे माजी उपसरपंच पै. जयवंतराव यादव, जिंतीचे माजी उपसरपंच पै. जयवंतराव शेवाळे,जिंतीचे पोलीस पाटील संतोष पाटील, मनवचे पोलीस पाटील मा. कृष्णत पोळ, पै. बापूराव पोळ, विलास चवरे, सागर विभुते, दादासो खुडे यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण दिसून आले असून, ग्रामीण भागात शिक्षणासाठी विधायक वातावरण निर्माण होत असल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.