मुंबई (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेले मार्लेश्वर देवाच्या नावाने होतकरू, हौशी क्रिकेट युवकांनी मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती स्थापन केली असून या समिती तर्फे मुंबई विभागसाठी २०२५-२०२७ या कालावधीसाठी आपली कार्यकारणी नुकतीच जाहिर केली.मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती – मुंबई कार्यकारिणी कार्यकाल २०२५ ते २०२७ असून यामध्ये नवनियुक्त पदाधिकारी निवडीत अध्यक्ष म्हणून संजय बेंद्रे (निवधे), तर कार्याध्यक्ष म्हणून अजित गोरुले (मारळ),तसेच उपाध्यक्षपदी विशाल शिवगण (हातिव),महेश शिंदे (ओझरे),सचिव म्हणून योगेश घोलम (खडी कोळवण),सहसचिव पदी प्रणव रेवाळे(आंगवली),प्रभात गुरव (बामणोली), आणि खजिनदार म्हणून राजेश गुरव (निवधे),
सह-खजिनदार विठोबा घवाळी (निनावे),हिशोब तपासनीस पदी सुशील गुरव (ओझरे), तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून
प्रदीप तोरसकर (कासार कोळवण),शशांक हातिम (ओझरे)यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी निवड झाल्यावर काही चर्चेतील ठळक मुद्दे व निर्णय ठरवण्यात आले. यामध्ये प्रत्येक गावातील संघाने मुंबईत किमान एक स्पर्धा आयोजित करावी.एकाच गावातील विविध संघांतील खेळाडूंना त्या गावाच्या इतर कोणत्याही संघात खेळण्यास मुभा.यासह अनेक महत्त्वाच्या बाबींवर एकमताने निर्णय घेण्यात आले.यनिमित्ताने
एंजॉय आंगवली क्रिकेट संघाचे प्रतिनिधी म्हणून गावाहून उपस्थित राहिलेले ग्रामीण कमिटी सचिव श्री.रणजीत पवार यांचे मुंबई कमिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल योगेश सालप यांचे आणि मुंबईतील क्रिकेटप्रेमी रितूभाई चंदेलिया यांचे अध्यक्ष संजय बेंद्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन मध्ये संजय बेंद्रे यांनी समितीच्या भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.तर सचिवीयांनी समारोप करताना सर्व नवनियुक्त पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे अभिनंदन करून पुढील क्रिकेट कार्यास शुभेच्छा दिल्या.योगेश घोलम यांनी सभेची सांगता करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.ही सभा संपूर्णपणे मैत्रीपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली.मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर होऊन अध्यक्षपदी संजय बेंद्रे तर कार्याध्यक्षपदी अजित गोरुले (मारळ)आणि सचिव पदी योगेश घोलम यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील सर्व क्रिकेट सामने आणि विविध उपक्रम यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर
RELATED ARTICLES