नागपूर: जळगाव पारोळा लोकेशन वरची 108 रुग्णवाहिका जळालेली प्रकरण ताजे असतानाच आता गडचिरोली मधील MH 14 CL 0517 या रुग्णवाहिकेला रुग्ण नागपूर ला नेत असताना आग लागली या वेळी सुद्धा पायलट आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे रुग्णाचे प्राण वाचले आणि जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे नक्की ‘ ‘ ‘ BVG – सुमित’ या कंत्राटदारांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित राहतो. एकाच आठवड्यात २ रुग्णवाहिका आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत या मागची नेमकी कारणे काय याचा विचार हे कंत्राटदार करणार कधी? पायलट आणि डॉक्टर फक्त तुमच्या नावासाठी जीव मुठीत घेऊन काम करणार का? गाड्यांचे ऑडिट हे नक्की गाड्या समोर बघून केले जाते का फक्त कागदावरच? असे असंख्य प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित व्हायला सुरवात झाली आहे. गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज भासते पण आता अशा गोष्टीमुळे आता स्वतः 108 रुग्णवाहिकाच अत्यवस्थ असलेली नागरिकांना पहायला भेटली अशा आगीच्या घटनांमुळे लोकांच्या मनात आता भीतीचे वातावरण झाले आहे. नक्की शासकीय सेवा देणाऱ्या या रुग्णवाहिका वापरायच्या की नाहीत? हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून राहिला आहे. आता या आगीच्या घटनांची जबाबदारी नक्की कोण घेणार या कडे मात्र नागरिकांचे लक्ष आहे लवकरच या घटनेसंबंधी संबंधित अधिकाऱ्यांनी समोर येऊन स्पष्ट माहिती द्यावी असे नागरिकांचे मत आहे.
BVG-सुमित ची 108 रुग्णवाहिकाच अत्यावस्थ!!! एकाच आठवड्यात दुसरी रुग्णवाहिका जळाली रुग्णाला गडचिरोली वरून नागपूर ला नेत असताना लागली आग
RELATED ARTICLES