Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रराजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे सन्मानित!

राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे सन्मानित!

सांगली : राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्ताने परिर्वतन फोडेंशन यांच्या वतीने राजर्षी शाहु प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. शाहूनगरीत राजर्षी शाहू स्मारक भवन मध्ये संपन्न झालेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात, सांगली जिल्ह्याच्या मातीत घडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे यांना त्यांच्या अपार साहित्य आणि समाजसेवाकार्याबद्दल, कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक मा. योगेशकुमार गुप्ता, मा. डॉ. राजेंद्रसिंग वालिया, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक मा. संतोष आठवले यांचे शुभ हस्ते अत्युच्च मानाचा अलौकिक असा “राजर्षी शाहु प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले.
दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे आणि त्यांची पत्नी, अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा लोंढे यांनी मिरज येथे शारदा वृद्धसेवाश्रम नांवाने वृद्धाश्रम स्थापन केले असून, शेकडो निराधार, वृद्ध मायबाप, अनाथ आणि वंचितांचे जिवापाड संगोपन केले आहे. करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवाकार्यामुळे त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख मा. योगेशकुमार गुप्ता व ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.असे उद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक मा. योगेशकुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात केले.
तर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या पावन जन्म व कर्मभूमीत त्यांच्या नांवाने आम्हां उभयतांना मिळालेला हा सर्वोच्च महासन्मान आमच्या प्रामाणिक सेवाकार्याची पोच पावती असून. आणखीन जोमाने, जबाबदारीने समाजाचीसेवा करण्याची ऊर्जा आणि हे परमभाग्य राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने आम्हांस लाभले आहे. ते सदैव आमच्या स्मरणात राहील. असे मत हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे यांनी व्यक्त केले.
परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल कुरणे यांचे नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, बी न्युजचे ताज मुल्लाणी, शेतमुजरांचे नेते सुरेश सासणे, मच्छिंद्र रुईकर, संजय कांबळे आणि नितेश कुमार दीक्षांत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments