लोणंद : केंद्र शासनाच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साकारलेली “वारी साक्षरतेची, पंढरीच्या दारी” ही रथयात्रा आज लोणंद नगरीत आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी राज्याच्या विविध मान्यवरांनी रथाला भेट देत साक्षरतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
या प्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभुराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार भाऊ गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मा. जि.प. उपाध्यक्ष नितीन बापू भरगुडे पाटील, पुण्याचे विभागीय आयुक्त मा. श्री. चंद्रकांत पुंडकुडवार, जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील, CEO पुणे गजानन पाटील, CEO सातारा याशनी नागराजन, सातारा DHO मा. श्री. महेश खलीपे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य समन्वयक संभाजी देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांचा “उल्लास उपरणे व टोपी” घालून गौरव करण्यात आला. यावेळी साक्षरतेच्या कार्यक्रमाची माहिती देणारी पत्रके देखील वाटण्यात आली.
डॉ. महेश पालकर (संचालक – योजना) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या साक्षरता रथयात्रेचे सर्वांनी विशेष कौतुक केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, केंद्रप्रमुख सुभाष ढालपे, शिक्षक दीपक भुजबळ आणि विविध स्वंयसेवक यांनी अतिशय मेहनत घेतली.