Saturday, July 5, 2025
घरआरोग्यविषयकधारावीतील "आयुष" हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांच्या मुलाच्या श्वासनलिकेतून मोबाईल फोनची पिन काढण्यात यश

धारावीतील “आयुष” हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांच्या मुलाच्या श्वासनलिकेतून मोबाईल फोनची पिन काढण्यात यश

प्रतिनिधी : धारावीतल्या आयुष हॉस्पिटलमध्ये अलीकडेच एका धक्कादायक आणि अतिशय गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणावर यशस्वी उपचार करण्यात आले. फक्त दोन वर्षांचा बालक परदेशी वस्तू गिळल्याच्या इतिहासासह रुग्णालयात दाखल झाला होता, आणि त्याच्या एक्स-रे चाचणीत मोबाईल फोनची पिन उजव्या ब्रॉन्कस (श्वासनलिकेचा उजवा भाग) मध्ये अडकलेली दिसून आली.

हा प्रकार लक्षात येताच तातडीने वैद्यकीय पथकाने आपत्कालीन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ती पिन बाहेर काढण्यात यश मिळवलं. वेळेवर उपचार झाल्यामुळे गंभीर अनर्थ टळला.असे डॉ. शशिकांत म्हशाल (सर्जन), डॉ.रत्नाकर गोसावी( भूलतज्ञ) यांनी सांगितले.

रुग्णालयातील बालरोग व छातीरोग तज्ज्ञांच्या तत्परतेमुळे मुलाचे प्राण वाचले. अशी परकीय वस्तू लहान मुलांच्या श्वसनमार्गात अडकणे ही फारच गंभीर बाब असते, आणि योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास प्राणघातक ठरू शकते.

पालकांनी लहान मुलांच्या आजूबाजूला असलेल्या धोकादायक छोट्या वस्तूंवर सतत लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, असा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments