प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे, मराठीबद्दल आम्ही कट्टर आहोत, मराठी भाषेबद्दल कट्टर पण विद्यार्थी हिताचे खंदे समर्थक आहोत. आम्ही मराठी बद्दल कट्टर आहोत पण हिंदुस्तानी अन्य भाषांचे आम्ही खूणी नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्रात शिक्षणामध्ये सक्ती फक्त मराठीचीच आहे. अन्य कुठल्या भाषेची नाही. राज्यात हिंदीची सक्ती याबाबत विपर्यास, गैरसमज पसरवले जात आहेत, ही भाजपची भूमिका नाही. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून कुठल्या भाषा असल्या पाहिजेत त्या पर्यायी ऐच्छिक भाषा विद्यार्थ्यांच्या इच्छेवर अवलंबून असतील. त्या जेवढ्या भाषा आहेत त्यात हिंदी असली पाहिजे असं आमचं मत आहे. उध्दव ठाकरे आज त्रिभाषा सुत्रावरुन बोलत आहेत त्यांना आठवण करुन देते की, राज्यात नवे शैक्षणिक धोरण हे फेब्रुवारी २०२२ स्विकारण्यात आले त्यावेळी आपणच मुख्यमंत्री होतात. आपण जरुर मराठी बाबत आग्रही रहा, मराठीचा आग्रह हा सुध्दा भाजपाचीच भूमिका आहे. आपण आज जे बोलत आहात त्यावेळी एक गोष्ट विसरू नका आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्रशासकीय पातळीवर सुरूवात झाली, असे सांगत मंत्री आशिष शेलार यांनी आज प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून
उध्दव ठाकरे यांना प्रतीउत्तर दिले.
आम्ही मराठी बद्दल कट्टर पण हिंदुस्तानी भाषांचे खूणी नाही : सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार
RELATED ARTICLES