स
ातारा(अजित जगताप) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील नीरा नदी किनारी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
अंगावर पावसाच्या सरी, भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांचे प्राण डोळ्यात साठले होते.
जिल्ह्याच्यावतीने पर्यटन माजी सैनिक कल्याण व खाणीकर्म मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन कांबळे – पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत भक्ती गीत धून वाजून स्वागत केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्था स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
पंचायत समिती खंडाळा व फलटण आणि लोणंद नगरपंचायत यांनी अहोरात्र परिश्रम केले. यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मानवता भावनेतून काहींनी स्वच्छतागृह उपलब्ध केले आहे. या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, याबद्दल महाराष्ट्रातून आलेल्या वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या आषाढी वारीमुळे खऱ्या अर्थाने माऊलीच्या रूपाने विठ्ठल रखुमाई चे दर्शन होते. अशी प्रतिक्रिया सेवेकरांनी दिली आहे. अनेक सेवेकरी निष्ठापूर्वक वारकऱ्यांची सेवा करत आहेत. तर काही राजकीय नेते व कार्यकर्त्यांमुळे गर्दी ओसंडून वात असले तरी त्याचा वारकऱ्यांना त्रास होऊ लागलेला आहे. हे सुद्धा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी सैनिक निलेश निकम व अँड .सुरेश रुपनवर यांनी भाविकांचे स्वागत केले.
____________________________
फोटो — सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचे स्वागत