मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांसाठी क्रांतिकारी ठरणारे “यात्री मित्र” हे मोबाईल अॅप नुकतेच लोकार्पित झाले. ऑटोरिक्षा प्रवास अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी मेटाझेन लॅब्स प्रा. लि. ने हे अॅप विकसित केले असून सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनमार्फत याचा प्रचार व प्रसार केला जात आहे.
हे अॅप मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुनिश्चित करते. कोणतेही अतिरिक्त कमिशन न आकारता चालकांना त्वरित पेमेंट, वैयक्तिक अपघात विमा, तर प्रवाशांना सर्ज प्रायसिंगपासून मुक्ती, थांबा स्वातंत्र्य व UPI पेमेंटसह सुविधा मिळणार आहे.२६ जून २०२५ पासून चालक व प्रवाशांची नोंदणी सुरू झाली असून, १५ जुलैपासून अॅप कार्यरत होईल. “Yatri Mitra Driver” अॅप Google Play Store वर आणि “Yatri Mitra (Passenger)” अॅप Google Play व App Store वर तसेच
www.sevasarathi.org वर उपलब्ध आहे.या उपक्रमाचे अध्यक्ष प्रदीप मेनन, सरचिटणीस डी.एम. गोसावी, नरेंद्र राव, प्रणव राव यांनी सर्व नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.