प्रतिनिधी : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या अंदाड येथील आश्रमशाळेला सातत्याने पायपीट करुन शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना साठ सायकलींची भेट मिळाली आणि या विद्यार्थी विद्यार्थीनींचे चेहरे आनंदाने फुलले.
अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाची शाखा असलेल्या माध्यमिक विद्यालय अंदाड येथे जागतिक योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यांत आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग केंद्र शहापूरचे योग शिक्षक श्री धर्मेश विशे हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे श्री धर्मेश विशे व विवेकानंद सेवा मंडळ व विद्याविकास मंडळ डोंबिवली यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. श्री धर्मेश विशे यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व व्यक्त करुन विविध योगासनांची प्रात्याक्षिके सादर केली.
यावेळी विवेकानंद सेवा मंडळ व विद्याविकास मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्तविद्यमाने शाळेतील पाडयावरील आदिवासी विद्यार्थ्यासाठी ६० सायकलींचा शाळार्पण सोहळा पार पडला. जेणे करुन आदिवासी मुलांची पायपिट / गैरहजेरी थांबून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सहभागी होतील हा उदात्त हेतू यापाठीमागे आहे. यावेळी विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद देशपांडे, नालंदा विभाग प्रमुख पराग पांगम, श्रुती कायचोर, निनाद जोशी, अमोघ पानगंद, तसेच विद्याविकास मंडळ डोंबिवली चे अध्यक्ष श्री.अतुल चक्रदेव ,अनघा चक्रदेव, राधिका वायंगणकर, सगुण आडारकर, भुषण धर्माधिकारी हे मान्यवर उपस्थित होते. यापुढेही आम्ही शाळेला सहकार्य करु, असे आश्वासन अध्यक्ष अतुल चक्रदेव यांनी दिले. या सर्व मान्यवरांचे शाळेकडून पुष्प देवून सहर्ष स्वागत करण्यांत आले.
शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री नितिन देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. दीपिका विशे यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री सुर्यवंशी यांनी टिपले. कार्यक्रमाचे फलक लेखन श्री मिलींद मोगरे यानी केले. श्री खाकर उपस्थित होते श्री महाले यांनी आभारप्रदर्शन केले.
जागतिक योग दिनी शहापूर येथील आश्रमशाळेला ६० सायकलींची भेट : विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले
RELATED ARTICLES