Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रस्पंदन ट्रस्टच्या ‘ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमास पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा

स्पंदन ट्रस्टच्या ‘ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमास पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने राबवलेल्या ज्ञानाची शिदोरी उपक्रमास पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक, व्हाॅटसअप या सोशल मिडीयाच्या वापरामुळे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. सोशल मिडीयामुळे ट्रस्टच्या ज्ञानाची शिदोरी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी उपक्रमाची माहिती फेसबुक, व्हाॅटसअपवर शेअर असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.
ट्रस्टचा ‘ज्ञानाची शिदोरी’ हा उपक्रम सुरु झाल्याबरोबर कागल (जि.कोल्हापूर) येथील शिक्षक दिनकर मल्लू पाटील यांनी या उपक्रमास आर्थिक मदत दिली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमास सहकार्य केलेल्यांना ट्रस्टच्या वतीने आकर्षक ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात येते.
ना.देसाई यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, ‘‘लोकसहभागातून नावीण्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आपल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चा हातखंडा आहे. ट्रस्टने शैक्षणिक क्षेत्रातही चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण विभागातील दुर्गम व खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ज्ञानाची शिदोरी हा उपक्रम राबवत असल्याचे वृत्तपत्रातून वाचनात आले. प्रथमतः आपल्या या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा…!’’
सदर उपक्रमात रोख रक्कम किंवा वस्तूच्या स्वरुपात मदत स्वीकारली जाईल. तसेच आपण आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत, स्नेहीजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य देवून सहभाग घेवू शकता. या उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक. 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे जमा करायचे आहेत.
तरी ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.चौकटीत : पालकमंत्र्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा :
सुमारे एक दशकापुर्वी आपण डाकेवाडी (काळगांव) येथे आपल्या निवासस्थानी मुलांना मोफत वहया वाटप माझ्या हस्ते केले होते. अशी आठवण सातारा जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पत्रातून व्यक्त करतानाच ‘ज्ञानाची शिदोरी’ या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, संस्था, ट्रस्ट यांनी मदत करावी असे आवाहनही या शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून केलेआहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments