मुंबई : (प्रतिनिधी)- चेंबुरच्या हरिहरपुत्र भजन समाज (रजि) संचलित ‘शंकरालयम’ येथे येत्या १ मे रोजी तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित केला आहे. हा महाकुंभाभिषेकम आद्य जगद्गुरु बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ श्री क्षेत्र शकटपुरम (कर्नाटक) यांच्या करकमलाद्वारे संपन्न होणार आहे.
यापुर्वी २००२ आणि २०१४ साली महा-कुंभाभिषेकमाचे शंकरालयम येथे जगदगुरुंच्याच हस्ते आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. कोविडमुळे आणि त्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे हा महाकुंभाभिषेकम सोहळा लांबला होता. यंदा भारतातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शंकरालयमचे अध्यक्ष जयंत लापसिया यांनी दिली. मुंबई प्रेसकल्बमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …. उपस्थित होते.
महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे धार्मिक विधी अग्रगण्य पुरोहित ब्रम्हश्री लक्ष्मीनारायणा सोमय्याजी आणि त्यांचे सहकारी पार पाडतील तर महाकुंभाभिषेकम पुर्व सोहळ्याचे धार्मिक रामासुब्बू आणि त्यांचे सहकारी पार पडतील. आयुष्यात एकदाच अशा घटनेचे साक्षी होण्याचे भाग्य लाभणाऱ्या अपुर्व अशा या धार्मिकसोहळ्याला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
“शंकरालयम- श्री हरिहरपुत्र भजन समाज (रजि) यां मुंबईतील चेंबूर या उपनगरातील संस्थेच्या चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना २००२ साली करण्यात आली. या मंदिरामध्ये धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास आहे. ‘शंकरालय’ हे अर्थातच देवत्व आणि अध्यात्मिकता यासाठी सुपरिचित आहे. येथे चालणारे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे जनतेच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी नियमितपणे राबविले जातात.
या मंदिरातील तळ मजल्यावर सुमारे ६ हजार चौरस फुटाचे सभागृह भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग अशा विविध कार्यक्रमांसाठी नेहमीच उप्लब्ध असते
याशिवाय प्रासादातील अन्य मजल्यांवरील सभागृहांचा विनियोग सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना, धर्मादाय आणि एकूणच धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो.
आद्य श्री शंकराचार्यानी शंकरालयाला ‘प्रति शबरीमाला’ असे संबोधले असून तेथील धर्म सस्थ म्हणजेच श्री अय्यप्याची मूर्ती ही तितकीच सामर्थ्यवान असत्याचे प्रतिपादन केले आहे. ज्या भक्त-श्रद्धाळूंना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला सारख्या पवित्र स्थानी जाने शक्य होत नाही त्यांनी ‘शंकरालया’ला भेट देऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला आद्य श्री शंकराचार्य यांनी दिला आहे. अशी माहिती जयंत लापसिया यांनी दिली.
या सोहळ्यात भारताचे अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी, , त्रावणकोर राजघराण्याच्या यूवराज्ञी आणि तिरुवनंतपुरमची महाराणी, श्रीमती थंब्रत्ती, भारताचे माजी शास्त्रीय सलागार डॉ. आर. चिदंबरम्, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी, श्री षण्मूरखानंद फाईन आर्टस आणि संगीत सभाचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, महिंद फायनान्स लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर , ऑटोटेक इंडस्ट्रिज-चेन्नईचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. जयरामन, अॅपकॉन्सचे उपाध्यक्ष डॉ. के. सुब्रमणियन, व्यवस्थापकीय संचालक एस. परमसिवन, रेडियन्स रिन्युएबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिकन संगमेश्वरम, अखिल भारतीय अय्याप्पा धर्म प्रचार सेवा समितीचे अध्यक्ष अय्यप्पा दास, रेडी टू वेट महिला संघटनेच्या पद्मा पिलुई, मेळ शान्ती समाजमचे अध्यक्ष शशी नम्बुथिरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
जगदगुरू शंकराचार्यांच्याहस्ते ‘शंकरालयम’येथे महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे आयोजन
RELATED ARTICLES