मुंबई(रमेश औताडे) : देशातील आघाडीची परीक्षा चाचणी राष्ट्रीय नीट यू जी २०२५ मध्ये नवी मुंबई नेरुळचा आरव अग्रवाल ने ऑल इंडिया रँक ( एअर १० ) आणि इश्मीत कौर ने ऑल इंडिया रँक ( एअर ८५ ) स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले असल्याने त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शैक्षणिक शिस्तीचे आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड कडून मिळालेल्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आकाश चे अकॅडेमिक आणि बिझनेस मुख्य डॉ. एच. आर. राव यांनी दिली.
नीट ही परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते आणि ती भारतातील सरकारी व खासगी वैद्यकीय एम बी बी एस, दंतवैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आहे. याशिवाय, परदेशात प्राथमिक वैद्यकीय पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही परीक्षा आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आकाशचे अत्यंत आभारी आहोत. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक मेंटरिंगमुळे आम्हाला अवघड विषय अल्प वेळेत आत्मसात करता आले. आकाश नसते तर हे यश शक्य झाले नसते असे विद्यार्थ्यांनी सांगितले. आकाश चे मुख्य अकॅडेमिक आणि बिझनेस मुख्य डॉ. एच. आर. राव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की नीट यू जी २०२५ मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे अपूर्व यश मिळवले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे.