Monday, June 16, 2025
घरमहाराष्ट्रजि प लेखा कर्मचारी संघटनेच्या विशेष सभा एकमुखी मागणीने गाजली..

जि प लेखा कर्मचारी संघटनेच्या विशेष सभा एकमुखी मागणीने गाजली..

सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना नोंदणीकृत क्रमांक १४२५ ची राज्यस्तर कार्यकारिणी विशेष सभा सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यामध्ये प्रामुख्याने एम. एफ. ए. एस. परीक्षा रद्द करण्याची एकमुखी मागणीसह, खुल्लर समिती वेतन त्रुटी अहवालाचा निषेध व्यक्त करण्यात आला. प्रारंभी दीप प्रज्वलन व महाराष्ट्र गीताने सभेला सुरुवात करण्यात आलीलेखा संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या सभेत राज्य शासनाच्या धर्तीवर सहाय्यक लेखाधिकारी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद वित्त व लेखा सेवा वर्ग ३ (एम एफ ए एस) परीक्षा रद्द करणे, १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतर मिळणारा आश्वासित प्रगती योजना लाभ देताना परीक्षा उत्तीर्ण अट काढणे, संघटनेला औद्योगिक व कामगार न्यायालयाची मान्यता घेणे, वेतन त्रुटी नागपूर न्यायालय दावा पाठपुरावा करणे, सहाय्यक लेखाधिकारी ते लेखाधिकारी पदोन्नतीसाठी पाठपुरावा करणे, वार्षिक सभासद वर्गणी एक हजार रुपये निश्चित करणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कनिष्ठ लेखाधिकारी पदे पुनर्जिवीत करणे, इत्यादी विषयांवर चर्चा होऊन टाळ्यांच्या गजरात ठराव संमत करण्यात आले.
खुल्लर समितीने वेतन त्रुटी अहवालात लेखा संवर्गाला डावलल्याने समितीचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेमुळे लेखा कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी गती मिळाली आहे.
सदर सभेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचे विशेष अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलेबद्दल राज्य संघटनेकडून नवनिर्वाचित सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. विश्वनाथ काटकर यांचा सत्कार आणि जिल्हा परिषद लेखा संवर्गात सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
सदर सभेस राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रशांत सुतार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर फसाळे, कार्याध्यक्ष पवन तलवारे, विभागीय उपाध्यक्ष तसेच विविध जिल्ह्यांचे सन्मानीय पदाधिकारी यांच्यासह सुमारे २५० हून अधिक पदाधिकारी अधिकारी/ कर्मचाऱ्यांची या विशेष सभेला उपस्थिती होती. या सभेला रवींद्र बोरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्तात्रय खराडे यांनी केले, राज्यभरातील संघटनेच्या विविध जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विजय कुंभार यांनी आभार मानले.
सभा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी सन्मानीय पदाधिकारी सुनील पवार, संतोष शिंदे , वैभव कदम, शिवराम सगभोर, शरद देशमुख, महेश खामकर, संदेश पिसे, सचिन शिंदे, इरफान मुल्ला, प्रवीण गंगावणे, संतोष शिंदे, सचिन कुंभार, चैतन्य घोडाम, किशोर खिलारे, विशाल गावडे, व इतर लेखा बांधव तसेच महिला पदाधिकारीमध्ये सीमा रजपूत, प्रतिभा सोनटक्के,सीमा कोळी, गुफराना पटेल, ज्योती गाढवे, वंदना जानकर व इतर महिला भगिणी यासह सर्व लेखा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाकडील संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.
______________________________
चौकट— लेखा कर्मचारी संघटनेच्या मागणीच्या एका फाईल साठी मंत्रालय पातळीवर कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून मागणी मंजूर करण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments