Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रगोवंडीत डंपरच्या धडकेत तिघांचा मृत्यू; रस्त्यावर रक्ताचे थारोळं, जमावाचा संताप उसळला!

गोवंडीत डंपरच्या धडकेत तिघांचा मृत्यू; रस्त्यावर रक्ताचे थारोळं, जमावाचा संताप उसळला!

मुंबई : मरण स्वस्त झालंय का? हा थरकाप उडवणारा प्रश्न पुन्हा एकदा मुंबईपुढं उभा ठाकलाय. गोवंडीच्या रस्त्यावर आज सकाळी अक्षरशः मृत्यूने तांडव केलं! घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर भरधाव डंपरनं तीन जणांना चिरडत जीव घेणारी धडक दिली. क्षणात रस्त्यावर रक्ताचे थारोळं सांडलं… आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

अपघात होताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण बघ्यांचा जमाव काहीच करू शकत नव्हता… कारण तिघंही जागीच संपले होते! डंपर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, एवढ्यात जमावानं त्याला गाठलं आणि पोलिसांच्या येण्यापूर्वीच त्याच्यावर तावातावानं हल्ला केला. शिवाजीनगर परिसरात स्थानिकांनी डंपरसमोर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन छेडलं. हातात फाटकं, घोषणा आणि डोळ्यांत राग! संतप्त जमावानं डंपरची तोडफोड केली. दोन्ही दिशांनी वाहतूक खोळंबली. मुंबई ते नवी मुंबई रस्ता तब्बल अडीच तास बंद करण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला समजवायचा प्रयत्न केला. पण ‘न्याय हवा, शिक्षा हवी!’ अशा संतप्त घोषणा थांबत नव्हत्या. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ही दुर्घटना केवळ एक अपघात नाही, तर बेदरकार वाहनचालकांमुळे किती आयुष्य उध्वस्त होतायत याची सलगण आठवण आहे. मरण इतकं सहज झालंय का? रस्त्यावर पाय ठेवणं म्हणजे जीवावरचं खेळ बनलंय का?

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments