Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यात शिवधनुष्य पेलण्यासाठी शिवसेना रणांगणात-- सेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले

सातारा जिल्ह्यात शिवधनुष्य पेलण्यासाठी शिवसेना रणांगणात– सेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी बाबत राज्याचे लक्ष असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवधनुष्य पेलण्यासाठी शिवसेना राजकीय रणांगणात उतरली आहे. जिल्ह्यात सेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन केले .सातारा जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धनुष्यबाण दिसण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी व सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. राज्यातील खंबीर नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे या तिन्ही नेत्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेनेची सत्ता आणि समाजकारण ही दोन्हीही रथाची चाके गतिमान झालेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिक व पदाधिकारी तळमळतेने झटत आहेत. शिवसेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले व त्यांच्या पदाधिकारी आणि सहकार्यांमुळे शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर युवकांचा प्रभाव वाढला आहे. त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. युवा सेना जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांची समर्थ साथ लाभत आहे.
सातारा शासकीय विश्रामगृह येथे आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला विचार मंथन व आगामी निवडणुकीतील रणनीती ठरवण्यात आली. शिवसेनेचे पदाधिकारी संभाजी पाटील, माने, प्रवीण तरडे, विकास शिंदे, एकनाथ ओंबळे, मेजर कणसे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे महायुतीच्या माध्यमातून समन्वयाने कामे केली जातात. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांच्या प्रयत्नाने विकास कामे गतीने होत आहेत. संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवसेनेची पकड मजबूत झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा महायुतीच्या माध्यमातून फडकत राहील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला आहे. सलग चार तास झालेल्या या बैठकीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा वैभव बघण्यास मिळाला.

_______________________________
फोटो– सातारा शिवसेनेच्या बैठकीमध्ये समन्वयाची भूमिका घेताना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले व मान्यवर पदाधिकारी( छाया– अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments