Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रन्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी.


मुंबई (शांताराम गुडेकर ) महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे .गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली. तर पालखी सोहळा गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ रोजी थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला . ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती. ग्रामसुधारक मंडळ न्हावे,कमिटी गजानन पांडुरंग म्हात्रे -अध्यक्ष,जयेंद्र जनार्दन पाटील -उपाध्यक्ष,निलेश हरिश्चंद्र भोईर -उपाध्यक्ष,प्रेमनाथ नामदेव म्हात्रे -उपाध्यक्ष,सतीश दत्ताराम भोईर -उपाध्यक्ष,विनोद एकनाथ पाटील -खजिनदार,

अनंत लहु म्हात्रे -सहखजिनदार,सदानंद जगजीवन पाटील -सहखजिनदार,विशाल लक्ष्मण ठाकूर -सहखजिनदिर, विजेंद्र गणेश पाटील -सरपंच,राजेश गणेश म्हात्रे -उपसरपंच, हिरालाल हरी पाटील,सुहास पाटील, मनीष गणेश भोईर,अशोक दामू भोईर,आणि सदस्य, तसेच इत्यादी पदाधिकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य,सुख,शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments