प्रतिनिधी : चेंबूर येथील सह्याद्री नगर (ब) विभागातील ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाच्या कामात गेल्या तीन वर्षांपासून अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकल्पासाठी एकूण कागदावरील खर्च 58 लाखांपेक्षा जास्त दाखविण्यात आला असून, पालिका अधिकारी व ठेकेदार यांनी या खर्चाची खात्री देण्याबाबत संशय निर्माण झाला आहे.
उपोषणात अणुशक्ती उपविभाग अध्यक्ष राजेश पुरभे, मनसे उपाध्यक्ष नवीन आचार्य, विभागाध्यक्ष रविंद्र गवस आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले की, झोपडपट्टी आणि परिसरातील रहिवाशांना घराजवळ त्वरित आरोग्य सेवेची सुविधा मिळावी म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे. मात्र, बांधकाम अर्धवट ठेवल्यामुळे, वापरण्यात आलेले हलक्या दर्जाचे साहित्य चोरीला जाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पालिकेने मुंबई व उपनगरात आरोग्य सेवेच्या योजना सुरू असतानाही, सह्याद्री नगरमधील हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ नये ही गंभीर बाब ठरली आहे. राजेश पुरभेंनी दिलेल्या आश्वासनानुसार, एक महिन्यात काम पुर्ण न झाल्यास मनसे आपल्या ठाम शैलीत उत्तर देईल.