प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन माथेरानमध्ये करण्यात आले होते.
यावेळी स्व. संतोष पवार राज्यस्तरीय संपादक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना प्रदान करण्यात आला. स्व सुनील दांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांना प्रदान करण्यात आला, तर स्व. धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्कार माथेरान येथील पत्रकार अजय कदम यांना प्रदान करण्यात आला. महेश म्हात्रे यांनी संतोष पवार यांच्या नावाने एखादा उपक्रम करावा म्हणून पुरस्काराची रक्कम कर्जत प्रेस क्लबकडे परत केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ वृत्त निवेदक भूषण करंदीकर, मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, चंद्रकांत चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश भगत, प्रवीण सपकाळ, कुलदीप जाधव, शकील पटेल, राजेश चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, कामगार नेत्या स्मृती म्हात्रे, सुनील गायकवाड, मनीषा पवार, संजीवनी गायकवाड आदी उपस्थित होते.
संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवरांसह माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.