Monday, June 16, 2025
घरमहाराष्ट्रदिव्यांग बांधवांसाठी सातारा पोलीस अधीक्षक आले प्रवेशद्वाराजवळ...

दिव्यांग बांधवांसाठी सातारा पोलीस अधीक्षक आले प्रवेशद्वाराजवळ…

सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे अनेक आंदोलने होतात. त्यांच्या न्याय मागणीसाठी ते आंदोलक बनतात. बुधवार दिनांक ११ जून रोजी संत कबीर जयंतीच्या व श्री साने गुरुजी स्मृतिदिना दिवशीच दिव्यांग बांधवांना निवेदन द्यायचे होते. परंतु, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ आले आणि त्यांनी निवेदन स्वीकारले. त्यांच्या या आपुलकीच्या गोष्टीने दिव्यांग बांधव सुद्धा भारावून गेले.
दिव्यांग बांधवांसाठी लढा देणारे माजी राज्यमंत्री तथा प्रहार अपंग संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे आंदोलन होत आहे. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी व दिव्यांग बांधवांच्या योजना कार्यान्वित करताना आमदार निधीतून तीस लाख खर्च करावे. संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा सहा हजार रुपये मदत द्यावी आणि महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. या प्रमुख मागण्यासाठी प्रहार अपंग संघटना आणि दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने गुरुवार दिनांक १२ जून रोजी दुपारी दीड वाजता पुणे– बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करायची होते. त्यासाठी लोकशाही मार्गाने रीतसर लेखी परवानगी मागण्यासाठी दिव्यांग बांधव आले होते. परंतु, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिव्यांग बांधवांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिना चढ-उतार करण्यापेक्षा आपण स्वतःहून प्रवेशद्वारा जवळ जाणे पसंत केले. त्यामुळे दिव्यांग बांधवांना सुद्धा सर्वसामान्यांची काळजी घेणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक लाभल्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कारण, दिव्यांग बांधवांनी केलेल्या आंदोलनामुळे एका राजकीय नेत्यांच्या सूचनेनुसार काही पोलिसांना गैरसोयीची बदलीला सामोरे जावे लागले होते. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिव्यांग बांधवांबद्दल दाखवलेली तळमळ बरच काही सांगून गेली. अशी प्रतिक्रिया दिव्यांगांनी व्यक्त केली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत बगले, शैलेश बोर्डे, अजय पवार, धर्मेंद्र कांबळे,अमोल निकम, भातुसे व इतर दिव्यांग बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धन्यवाद दिले. गुरुवार दिनांक 12 जून रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी प्रहारच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

______________________________
फोटो– दिव्यांग बांधवांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी ही स्वतः प्रवेशद्वारावर आले (छाया– अजित जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments