Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रकराड येथे स्वाभिमानी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन; व्यंगचित्रकार अशोक सुतार,लेखक मंडलिक,पत्रकार विजया माने...

कराड येथे स्वाभिमानी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन; व्यंगचित्रकार अशोक सुतार,लेखक मंडलिक,पत्रकार विजया माने यांच्यासह अनेकांचा पुरस्कारांमध्ये समावेश

कराड (विजया माने) : अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरावडे सामाजिक संस्था यांच्या वतीने दिनांक १ जुलै २०२५ रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन कराड येथे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी डॉ कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड व कल्पना चावला स्पेस अकडमी संचालक,लोणावळा, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्राप्त डॉ संजयजी पुजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांना ‘स्वाभिमानी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्धघाटक कवी,लेखक, प्रकाशक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विक्रम शिंदे असून त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व समाज भूषण व्यंगचित्रकार अशोकजी सुतार हे असतील. त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे व स्वागताध्यक्ष म्हणून कवी लेखक साहित्य भूषण व समाज भूषण पुरस्कार प्राप्त सत्यवान मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे. कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए ताशिलदारसाहेब व कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत हटकरसाहेब हे प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना खालील प्रमाणे पुरस्कार देण्यात येणार आहेत- १)सौ अनिता चेतन घाडगे- राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार, २) श्री सुहास महादेव चव्हाण- महात्मा जोतिराव फुले समाजसेवा पुरस्कार ३)श्रीमती कांचन देविदास क्षीरसागर- सावित्रीबाई फुले समाज सेवा पुरस्कार ४)श्री सर्जेराव देशमुख व अस्मिता देशमुख- महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले पुरस्कार ५)संतोष शामराव पवार- स्वाभिमानी उद्योग सेवा पुरस्कार ६)शितल कुमार अर्धावर- डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सेवा पुरस्कार ७)संतोष उर्फ संताजी नेताजी पाटील- छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी सेवा पुरस्कार ८)विजय वसंतराव चव्हाण- छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी सेवा पुरस्कार ९)ग्रंथ मित्र विश्वास अण्णा निकम – स्वाभिमानी आदर्श ग्रंथ सेवा पुरस्कार १०)संतोष डांगे- स्वाभिमानी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार ११)अमर जाधव- स्वाभिमानी आरोग्य सेवक पुरस्कार १२)सौ विजया जितेंद्र माने स्वाभिमानी आदर्श पत्रकारिता पुरस्कार व १३)सौ विद्या उत्तम मोरे- स्वाभिमानी समाजसेवा पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच साहित्य क्षेत्रातील स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार १)विशाल मोहोड, अमरावती २)दिवाकर म्हात्रे, मुंबई ३) गोकुळ गायकवाड -जामखेड,४)आरती लाटणे, इचलकरंजी ५)शरद गणेश अत्रे, पुणे ६)डॉ सुनिता चव्हाण, मुंबई ७) प्रा. प्रमोद नारायणे, वर्धा ८)डॉक्टर सुरेश वाकचौरे- मावळ ९)डॉ देविदास तारु, नांदेड १०)डॉ विनय दांदळे, अकोला ११)प्रा.पंढरी बनसोडे, लातूर १२) श्री विक्रांत केसरकर, पालघर १३)भारती पाटील, इस्लामपूर १४)सोमनाथ पगार, नाशिक १५)रेखा दीक्षित, कोल्हापूर १६)डॉ प्रभाकर शेळके, जालना १७)शशांक देशमुख, अमरावती १८)कवी आनंद हरी व मेहबूब जमादार १९)श्रीनिवास वसंत दीक्षित, सांगली २०)कवी कांचनदत्त उर्फ दत्तात्रय पाटील, कोल्हापूर २१) विलास माळी, गडहिंग्लज २२)इंद्रजीत पाटील, बार्शी २३)नरेश गणपत पाटील, पनवेल २४)श्री दत्तात्रय शिवराम हिर्लेकर (गुरुजी) कणकवली, २५)दिनकर काकडे, सांगली २६)सुशीला सतीशकुमार माने, इचलकरंजी २७)नंदकुमार शेडगे, सातारा २८)प्रा. आर आर मांगले व श्री एम एस जाधव, इचलकरंजी व उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार मुक्तसंवादला प्रदान करण्यात येणार आहे.
सत्यवान मंडलिक यांनी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडताना सर्व मान्यवर पुरस्कारार्थींची योग्य निवड करून सन्मान दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments