Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रमंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात कारागृहातील कैद्यांच्या कौशल्य प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात कारागृहातील कैद्यांच्या कौशल्य प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

मुंबई-मंगळवार- (सदानंद खोपकर)मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगण, हा विभाग म्हणजे राज्यभरातील महिला बचतगट व कृषीउत्पादनांना शहरी ग्राहकांत गावाकडील उत्पादने, प्रदर्शनांतून उपलब्ध होण्याचे ठिकाण. आज राज्यातील ठिकठिकाणच्या कारागृहातील कैद्यांनी आपल्या कुशल अदाकारीने घडविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले.शासकीय कर्मचारी व मंत्रालयात येणारे लोक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी कौशल्य, प्रशिक्षण व रोजगार देणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्रिमूर्ती प्रांगण येथे
येरवडा कारागृह 2, कोल्हापूर,अमरावती, संभाजीनगर,नाशिकरोड, ठाणे,नागपूर, येथील कारागृहातील बौद्धांनी घडवलेल्या वस्तूंचे प्रत्येकी एक स्टॉल येथे आहेत.टेक्सटाइल,सूतारकाम, पूजामंदिर, चौरंग,पाट, खूर्च्या, सतरंजी, विविध प्रकारचे कपडे ,जाकीट यांचा समावेश आहे.
या कारागृह उद्योगाने 2020-21-9.40(कोटी)21-22-11.10,22-23-17.94,23-24-16.702024-25आतापर्यंत 18.31 कोटी रुपयांची उत्पादने निर्माण केली अशी माहिती मिळाली. याआधी विभागाने 2016 साली प्रदशन आयोजित केले होते. सध्या भरविलेले प्रदर्शन

तीन दिवस सुरू राहणार आहे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments