मुंबई : ९ जून संध्याकाळी ५ वाज ता लालबागच्या न्यू हनूमान थिएटरमध्ये लोककलेचे प्रेरणास्थान स्व.मधूशेट नेराळे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने “भव्य शाहिरी मेळावा”संपन्न होणार आहे.मेळाव्यात शाहिरी लोक गितावर नृत्यांगना पारंपारिक नृत्य सादर करून, गितामागील भाव सजिव करणार आहेत.तसेच त्या गितांवर नृत्यांगना आपल्या कमनीय नृत्याविष्कारातून लोकोत्सवाची रंजकता उत्तोरोत्तर वृध्दिंगत करणार आहेत.
ज्या मुंबईच्या गिरणगावात शाहिरी लोककलेचा जन्म झाला,त्याच गिरणगावात शाहिरी लोकगितांची आतिषबाजी होऊन इतिहासाची उजळणी होणार आहे.शाहिरी लोक कला मंच आणि नेराळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा “शाहिरी मेळावा” पार पडत आहे. संस्थेचे सरचिटणीस शाहीर मधु खामकर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि संकल्पनेतून साकार होणा-या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण,उपाध्यक्ष शाहीर दत्ता ठुले,शाहीर कमला कर पाटील आदी कलाकार काळाआड जाऊ पाहणारी गाणी सादर करून नव्याने लोक कलेला उजाळा देणार आहेत.या सर्व नव्या- जुन्या गाण्यांवर आजचे आघाडीचे मराठी सिने संगीतकार मनोहर गोलांबरे संगीत संयोजन करुन,लोककला महोत्सवात अधिक रंजकता आणणार आहेत.ज्येष्ठ वादक अशोक वायंगणकर,ज्ञांनेश ढोरे(ढोलकी),डॉ.खुशाले यांची त्यांना साथ लाभणार आहे.या लोककला महोत्सवात नृत्या विष्कावर विशेष भर देण्यात येणार आहे.नव्या दमाचे नृत्यदिग्दर्शक गणेश कारंडे यांच्या दिग्दर्शनाखाली,आधी गणाला रणी आणीला, उचलला हारा, या कोळी वाड्याची शान, झुंजू मुंजू पहाट झाली आणि खंडोबा रायाचं याड बाय लागलं मुरलीला”या सारख्या अनेक लोकप्रिय गण्यावर नरेंद्र बेलोसे, प्रकाश पांचाळ,अश्विनी कारंडे बामणोलकर, तेजस्वीनी कारंडे,सलोनी मांजरेकर,दिपिका मसुरकर,काव्या माने आपला नृत्याविष्कार कल्पकतेने सादर करून कार्यक्रमाची रंजकता अधिकच खुलविणार आहेत.कार्यक्रम अधिक दर्जेदार व्हावा आणि तो गिरणगावाची शान वाढविणारा ठरावा, यासाठी संस्थेचे समन्वयक कथा लेखक काशिनाथ माटल, कोषाध्यक्ष संगितकार महादेव खैरमोडे,कलाप्रेमी हेमराज नेराळे हे पडद्या मागे राहून कष्ट घेताना दिसत आहेत.त्यांना अन्य कलाकारांची चांगलीच साथ लाभली आहे.प्रवेश विनामूल्य असल्याने सर्व रसिकांना आयोजकांनी निमंत्रित केले आहे.••• KNM
९ जूनला लालबागचे हनुमान थिएटर “खंडोबा रायाचं याड” या धून वरील नृत्यावर थिरकणार!
RELATED ARTICLES