मिरज :-पश्चिम महाराष्ट्रातील सहकार तत्वावरील एकमेव असणाऱ्या ‘राजारामबापू सहकारी कारखाना ली. मिरज या संस्थेच्या चेरमनपदी ऍड. वैशाली उदय देवर्षी यांची निवड करण्यात आली.
ज्यावेळी सिमेंट लेव्ही मध्ये मिळत होते. त्यावेळी दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी त्यावेळी बारमाही दुष्काळ असणाऱ्या नरवाड या गावी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे या हेतूने या संस्थेची स्थापना केली. या कारखान्यामार्फत उत्पादीत होणारे सिमेंट हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, मृदू संधारण अशां अनेक विभागानां पुरवठा होत होता.कोकणामध्येही शासनाच्या विविध बांधकामासाठी आपल्या सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला असल्याचे सांगून काहीं तांत्रिक कारणामुळे उत्पादन बंद ठेवावे लागले असून सदरचे उत्पादन पुन्हा सुरु करण्यासाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती नूतन चेअरमन ऍड.वैशाली उदय देवर्षी यांनी सांगितले. निवडणूक अध्ययासी अधिकारी म्हणून सहकार विभागाचे श्री सचिन काशीद साहेब यांनी काम पहिले. दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.अण्णासाहेब देसाई, प्रा.अजितकुमार पाचोरे,ऍड.फैय्याजअहंमद झारी, श्री.बी.बी.शेंडगे,श्री मुबारक सनदी,श्री शिवगोंड पाटील, सौ. सुप्रभा पाटील या संचालकांसह प्रा. एस.ए.पाटील, यशवंत शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती विनयश्री पाटील,ग्राहक विकास सोसायटीच्या संचालिका सौ. सरोज रायनाडे, अर्थ सल्लागार श्री उदय देवर्षी,कुपवाड अर्बन क्रेडिट सोसायटीचे सल्लागार श्री. जीतेन रायनाडे,वृदगसेवाश्रमाचे सचिव प्रा. महावीर सौन्दत्ते,श्री प्रणव पाटील,वितराग देवर्षी,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थिय होते.
राजारामबापू सहकारी सिमेंट कारखाच्या चेअरमनपदी ऍड.वैशाली उदय देवर्षी यांची निवड
RELATED ARTICLES