या सोहळ्यात प्रख्यात साहित्यिक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे बीज भाषण, तसेच पद्मश्री अच्युत पालव, अर्जुन पुरस्कार विजेती अभिलाषा म्हात्रे, उद्योजक प्रकाश बाविस्कर आणि सुप्रसिद्ध कलावंत अशोक हांडे यांचा लोकनेते,राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी शाहीर रुपचंद चव्हाण यांचा “शाहिरी बाणा महाराष्ट्राचा” हा विशेष शाहिरी कार्यक्रमही होणार आहे.
हा सोहळा शिव तुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील (कोपरखैरणे) यांच्या नेतृत्वाखाली आणि विविध मंडळांच्या सहभागातून आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.