प्रतिनिधी : देशातील कांदा उत्पादकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर करत कांदा निर्यातीला हिरवा झेंडा दाखविला आहे. यानुसार, ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळणार आहे.केंद्र सरकारने सहा देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली असून कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशिअस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. २ हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती आणि काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यावरुन, विरोधकांनी आरोप करत महाराष्ट्र आणि गुजरात असा मुद्दा केला होता. अखेर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने योग्यवेळी हा निर्णय घेतला असून उन्हाळी कांदा अजून शेतात आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील कांदा उत्पादकांना होणार आहे,