Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रशेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून साकारले शिवाजी महाराज

शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून साकारले शिवाजी महाराज

तळमावले/वार्ताहर : ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे लाखो मावळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक, धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या असीम त्याग, शौर्याला मुजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांचे रक्तातून चित्र रेखाटल्याचे संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.

रक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने काढण्यासाठी तळमावले (ता. पाटण) येथील श्री राम क्लिनिकल लॅबोरेटरीचे डॉ. सतीश जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यापूर्वी संदीप डाकवे यांनी भिंतीवर शिवराज्याभिषेक सोहळा, कवडीवर सिंहासनारुढ महाराजांची प्रतिमा, भाकरीवर शिवाजी महाराज तसेच मावळे व किल्ले यांच्या नावातून शिवरायांची प्रतिमा साकारत मानवंदना दिली आहे.
शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कलाकृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments