मुंबई – राज्यातील सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ५ जून २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शांततेत भव्य निवेदन आंदोलन होणार आहे.
सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने होणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातून सुमारे दोन हजार सेवानिवृत्त पोलीस बांधव सहभागी होणार असून वेतन श्रेणी सुधारणा, पेन्शन परतफेड, वैद्यकीय सुविधा, सेवाकाळातील कामाच्या तासांचे मोबदले यासह अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
संपत जाधव अध्यक्ष असलेल्या संस्थेने पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाची योग्य ती दखल घ्यावी आणि न्यायासाठी चाललेल्या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन केले आहे.