प्रतिनिधी : रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार २८ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपासून १० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी-सेमी जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील. या लोकल वेळापत्रकानुसार १० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप, धीम्या-सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर थांबतील.हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल.- ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या कालावधीत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.वसई रोड यार्ड येथे दिवा लाईनवर नाइट ब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी वसई रोड यार्ड येथे २७-२८ एप्रिल रोजी मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ३.१५ या वेळेत अप आणि डाऊन दिवा मार्गावर तीन तासांचा मोठा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवार २८ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
रविवार २८ एप्रिल रोजी मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
RELATED ARTICLES