Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रसार्वजनिक शौचालयाची दुरवस्था चेंबूरमध्ये ११ जूनला 'टमरेल मोर्चा'

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था चेंबूरमध्ये ११ जूनला ‘टमरेल मोर्चा’

मुंबई- गेल्या तीन वर्षांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नवीन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव असताना पालिका अधिकारी जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी बुधवार ११ जून रोजी एम पालिका कार्यालयावर ‘टमरेल मोर्चा’ मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अवघ्या १० वर्षांपूर्वी दुमजली बांधण्यात आलेले हे शौचालय तीन वर्षांपूर्वी पालिकेने धोकादायक बनल्याचा निष्कर्ष काढत तोडून टाकले आहे.त्याठिकाणी अत्याधुनिक सोयींनी युक्त असे शौचालय बांधले जाणार होते.तसा आराखडाही तयार करण्यात आला होता. परंतु त्या परिसरात एसआरए प्रकल्प राबविणार्‍या विकासकांने नवीन शौचालय बांधण्यास हरकत घेत रहिवाशांना तात्पुरते शौचालय बांधुन देण्याची हमी पालिकेला दिली.त्यानंतर विकासकाने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि गैरसोयीचे असे ‘कंटेनर शौचालय’ उभे केले.या शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याठिकाणी पाणी, विजेची सोय नाही, तिथे कधीच स्वच्छता केली जात नाही.त्यामुळे अस्वच्छता वाढत चालली आहे.

पालिकेने तिथेच नवीन शौचालय बांधावे यासाठी पालिका आयुक्तच नव्हे तर राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र तरीही चेंबूरकरांची ही मूलभूत समस्या कुणी दूर करू शकलेले नाही. त्यामुळे आता स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समिती स्थापन केली आहे.या समितीच्या माध्यमातूनच आपली समस्या सोडविण्यासाठी आक्रोश व्यक्त करत ११ जून रोजी सकाळी १० वाजता एम पालिका कार्यालयावर ‘टमरेल/चिंपाट मोर्चा’ मोर्चा काढला जाणार आहे. तरी सर्व स्थानिक रहिवाशांनी या मोर्चात
सहभागी व्हावे,असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments