किवळ(प्रताप भणगे) : मौजे किवळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रध्देने साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रात महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देण्यात आला.
हा पुरस्कार माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगीता साळुंखे (माई) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय साळुंखे, लोकनियुक्त सरपंच प्रदीप काशीद, उपसरपंच प्रभाकर पवार, चेअरमन सुहास साळुंखे, माजी उपसरपंच कैलास साळुंखे, देवस्थान कमिटी सचिव रामराव साळुंखे (आप्पा), समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जस्मिन मुल्ला, आरोग्य सेविका एस.ए. रुपनर मॅडम यांची उपस्थिती लाभली.
तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन साळुंखे, पार्वती जाधव, प्रभावती सूर्यवंशी, रेश्मा मुलाणी, शिवाजी साळुंखे सर, कुंदाताई साळुंखे, सीमा शेडगे, विमल जाधव, सायरा मुलाणी, कोमल साळुंखे, सारिका जाधव, महेश साळुंखे, सुरेश कुंभार, आनंदराव साळुंखे, रवींद्र साळुंखे, हिंदुराव साळुंखे, नरेंद्र माने आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल माई चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.