तळमावले/वार्ताहर : ग्रामीण विभागातील दुर्गम व खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
लोकसहभागातून नेहमीच नावीण्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चा हातखंडा आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ज्ञानाची शिदोरी उपक्रमामधून रु. अठ्ठावीस हजार शंभर किमतीचे, एक वही एक पेन उपक्रमांतर्गत रु. सोळा हजार किमतीचे, माणुसकीच्या वहया उपक्रमामधून रु.अकरा हजार किमतीचे, ग्रंथतुलेतून अकरा हजार किमतीचे, डाकेवाडी शाळेला रु. पाच हजार किमतीचे शैक्षणिक साहित्य वितरण केले आहे. तसेच दहा गणवेश वाटप, विविध सामाजिक उपक्रमासाठी दहा हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.सहा हजार, प्रतिवर्षी स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक अशी रोख स्वरुपात मदत केली आहे.
याशिवाय जि.प.प्राथ.शाळा डाकेवाडी (काळगांव) रंगकाम व बोलक्या भिंती, कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, जि.प.प्राथ. केंद्रशाळा काळगांव, कुठरे व जांभूळवाडीला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, मतीमंद मुलांच्या शाळेस मदत, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, विनामूल्य भिंती रेखाटन, किल्ले बनवा स्पर्धा, ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने इ. शैक्षणिक उठावास मदत केली आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात.,
सदर उपक्रमात रोख रक्कम किंवा वस्तूच्या स्वरुपात मदत स्वीकारली जाईल. तसेच आपण आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत, स्नेहीजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य देवून सहभाग घेवू शकता.
या उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक. 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे जमा करायचे आहेत.
तरी ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.
*चौकटीत : दानशूरांना डिजीटल कृतज्ञता सन्मानपत्र :*
‘ज्ञानाची शिदोरी’ या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, संस्था, ट्रस्ट यांनी मदत करावी. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होईल. तसेच या उपक्रमात भरघोस मदत केलेल्यांना ट्रस्टच्या वतीने आकर्षक डिजिटल ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात येणार आहे, असे मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.