घोगाव, ता. कराड (जि. सातारा) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिणमधील मौजे घोगाव येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण साळुंखे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
ही भेट पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि जवळीक दाखवणारी ठरली. नारायण साळुंखे यांनी मेहनतीने उभारलेल्या आपल्या स्वप्नातील घरात मा. चव्हाण यांनी येऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. काँग्रेस पक्ष नेहमी गोरगरीब आणि सामान्य जनतेसोबत उभा आहे, हे आजच्या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या प्रसंगी परिसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. समाजसेवक एकनाथ तांबेकर, शंकर हरी पाटील, जयसिंग पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष पाटील, सिद्धी पेट्रोल पंपाचे मालक महादेव भेदाटे, सरपंच मीनाक्षी साळुंखे, महादेव साळुंखे, शहाजी पाटील आणि शिवाजी पाटील आदी मान्यवरही या भेटीवेळी उपस्थित होते.
मा. चव्हाण यांचे आगमन आणि साधेपणाने घेतलेली सदिच्छा भेट यामुळे गावात उत्साहाचे वातावरण होते. सर्वांनी आपले मन:पूर्वक स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले.
.