दहिवडी(अजित जगताप) : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात माण- फलटण-खटाव तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पाऊस ओसरल्यानंतर मान्यवरांच्या पाहणी दौऱ्याने काही लाभार्थींचा लाभ झाला. पण, पावसामुळे घर व शेतीचे नुकसानग्रस्त लोकांना आत्मचिंतन करावे लागले आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पाहणी दौऱ्यात नाव नुकसानग्रस्त महिलेने टाहो फोडला. त्यांना दिलासा देण्याचे काम मंत्री गोरे यांनी केले. या वेळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त जिल्हा अधिकारी मल्लिकार्जुन माने, तालुका जिल्हा सातारा चव्हाण तालुक्यातील स्थानिक प्रशासन व प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दळणवळणाचे साधन म्हणजे अनेक ठिकाणी रस्ते जमीन दोस्त झाले. फलटण तालुक्यातील तरटेवाडी या ठिकाणी जे.सी.बी.च्या उजेडात रस्त्याचे काम पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने चांगला संदेश दिला होता. इतर जिल्ह्यातील वाहतूक पर्याय ठिकाणीही तशीच अवस्था झाली. तातडीने नुकसानग्रस्तांना मदत मिळणे अशक्य झाले असले तरी स्थानिक पातळीवर ग्रामस्थ व शासकीय कर्मचाऱ्यांनी मानवता भावनेतून मदत केली. हीच मदत सध्या दिलासादायक ठरली . आता दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून नेमके किती पंचनामे होतील? व किती जणांना मदत होईल? हे येणारा काळच ठरवेल असे नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी सांगितले.
दुष्काळी भागात फारसा पाऊस नसल्यामुळे चार वर्षातून एकदा नैसर्गिक संकट कोसळते. पण अवकाळी पावसाने सर्वांचा अंदाज फोल ठरवला. पळशी येथील बंधाऱ्यात नवनाथ पाटोळे हा तरुण पाण्याचा प्रवाह वाढला. त्याचा अंदाज न आल्याने पाय घसरल्यामुळे वाहून गेला. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू देह सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे पावसाळ्यात काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. पावसाचा जोर होता त्यावेळेला स्थानिक प्रसार माध्यमांनी प्रशासनाला जाग आणली. आता त्यानंतर मान्यवरांच्या पाहणी दौऱ्यामध्ये सर्वांनीच त्याची काळजीपूर्वक नोंद घेतली. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभारी मानले.
अवकाळी पावसामध्ये माणुसकीचा धर्म पाळून एकामेकांना सहकार्य केले. राजकीय मतभेद विसरून माणुसकी जिंकली. पण काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलासा देण्याचे काम केले नाही अशी पोट तिडकीने नुकसानग्रस्त तक्रार करत आहे. दुष्काळी भागामध्ये मंत्री महोदयांच्या दौऱ्यानिमित्त वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाहणी दौऱ्यात उशिरा का होईना दिलासा देण्याचे काम केले. दुष्काळी भागात पाणी आल्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले पण पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर मात्र कुणी तिकडे फिरकले नाही. हे आता सुज्ञ मतदारांनी लक्षात ठेवून आगामी कोणत्याही निवडणुकीमध्ये घरात शिरलले व डोळ्यातील पाणी विसरू नये. अशी तिखट प्रतिक्रिया वरकुटी, मलवडी, वाकी, देवापुर आंधळी परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
________________________________________
फोटो– अवकाळी पाऊस बंद झाल्यानंतर अतिवृष्टीची पाहणी करताना मान्यवर …