क
कराड(विजया माने) : मलकापूर-कराड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हा यांच्या वतीने भव्य महिला मेळावा, बांधकाम कामगार सन्मान व साहित्य वाटप तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री बिरदेव मंदिर येथे महाआरतीने झाली.
या वेळी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचा उजाळा देत वक्त्यांनी त्यांच्या सामाजिक व प्रशासनिक कार्याचे स्मरण केले. त्यांनी केलेल्या मंदिर जिर्णोद्धार, अन्नछत्र, धर्मशाळा, घाटबांधणी याबरोबरच सैनिकी ताकद व जनसेवेचे योगदान अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण, न्यायनिष्ठ आणि लोकहितवादी कार्यपद्धतीचा वारसा जपण्याची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमास भाजपा प्रदेश सचिव मा. भरतनाना पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मा. विक्रम पावसकर, कराड उत्तरचे आमदार मा. मनोज घोरपडे, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त श्री. बाळासाहेब वाघ, सातारा जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मा. नितीन कवले, कृष्णा सरिता महिला बाजारच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, जागृती शुगरच्या चेअरमन सौ. गौरवी भोसले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, बांधकाम कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.