Tuesday, July 29, 2025
घरमहाराष्ट्रमातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई(रमेश औताडे) : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या व उपवर्गीकरण या विषयावर आझाद मैदानात राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाची दखल सरकारने घेतली असून मंत्रालयीन स्तरावर एक बैठक घेऊन या समाजाला न्याय देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.

महाआक्रोश मोर्च्यात खेड्यापाड्यातून आलेल्या राज्यातील हजारो मातंग बांधवांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे समाज बांधवांनी आनंदी भावना व्यक्त केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मातंग स्वाभिमान संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देत संघटनेचे राष्ट्रीय नेते दिलीप भाऊ यादव, रमेश दोडके, गजाननराव वानखेडे, राजीव मानकर , सीताबाई चांदणे,समाधान सावळे , अनिल सुरळकर , सचिन चांदणे यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments