मुंबई(रमेश औताडे) : रहिवाशांचा विरोध डावलत कायद्याचे पालन न करता नागरी वस्ती जवळ तयार केलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे मुळे भर पावसात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारी पडणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत योग्य त्या उपाय योजना करून नागरिकांना आधार द्यावा व त्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे. अशी मागणी ” ला शिमर ” या वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेने नागरी वस्तीपासून घनकचरा प्रकल्प उभारला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार अशी कचऱ्याची डंपिंग ग्राउंड किमान २०० मीटर दूर असला पाहिजेत. डम्पिंग ग्राउंड जवळील वसाहतीतील रहिवाशांचा विरोध डावलून हा प्रकल्प उभारला असून त्याच्या दुर्गंधीने लोक हैराण झाले आहेत. काही रहिवासी घरे सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत.
महापालिकेने नियम धाब्यावर बसवून ४० मीटर उंच प्रकल्प उभारला आहे.पावसाळ्यात समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यामुळे या प्रकल्पाचे पत्रे उडून जात असून मोठी दुर्घटना होऊ शकते. नागरी वस्तीजवळ कचरा ओतला आहे. त्यावर रसायन फवारणी केली जात नाही. मातीचा थर ही टाकला जात नाही. संबंधित अधिकारी या प्रकरणी गंभीर नाहीत. स्वच्छता अधिकारी प्रकाश पवार यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत नागरिकांच्या आरोग्यचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.