मुंबई : राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे, गटई चर्मकार बांधवांना होणाऱ्या त्रासांविरोधात आणि तोडक कारवाईबाबत तक्रारी मांडण्यासाठी मनपा पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. वळीव साहेब यांची भेट घेण्यात आली.
ही भेट मंगळवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष मा. बबनराव (नाना) घोलप यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, मुंबई गटई अध्यक्ष श्री. बाळू अ
हिरे, जिल्हाध्यक्ष बाबू गोरे, उत्तर मुंबई गटई अध्यक्ष सूर्यकांत कांबळे तसेच भाजपा नगरसेविका मा. सौ. दीक्षा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान, सहाय्यक आयुक्तांना नवनियुक्तीबद्दल पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेत गटई चर्मकार बांधवांना होणाऱ्या अन्यायकारक त्रासाबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. विनाकारण होणाऱ्या तोडक कारवाईबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत, प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती केली.
सहाय्यक आयुक्त श्री. वळीव साहेबांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, कोणत्याही बांधवाला विनाकारण त्रास दिला जाणार नाही याची ग्वाही दिली. या प्रसंगी अंदाजे ६० ते ७० गटई चर्मकार बांधव उपस्थित होते. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.