Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रकर्जतच्या 11 नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश   प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण...

कर्जतच्या 11 नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश   प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजच्या प्रवेशामुळे कर्जत – जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments