परळी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त लोहा (जि. नांदेड) येथून निघणाऱ्या भव्य दिंडी रथयात्रेचे २७ मे रोजी सायंकाळी परळीमध्ये उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र माळेगाव (खंडोबा यात्रा) येथून प्रारंभ होणारी ही यात्रा श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, अहिल्यानगर) येथे पोहोचणार आहे.
परळी शहरात ही दिंडी छत्रपती संभाजी चौक (इटके कॉर्नर) येथून पायी यात्रा सुरू करत सुभाष चौक रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री संत जगमित्र नागा मंदिरात पोहोचेल. मंदिरात समाजबांधवांतर्फे या दिंडीचे स्वागत मोठ्या जल्लोषात होणार आहे. स्वागताचे आयोजन परळीतील डॉ. प्रा.उत्तम धुमाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, प्रभाकरराव वाघमोडे,भीमराव सातपुते,डॉ. श्याम काळे, दिलीप आबा बिडगर, माऊली बिडगर, माऊली गडदे , बाबासाहेब काळे, मुन्ना काळे,शिवदास बिडगर, देवकते, काकडे प्रा डॉक्टर उत्तम धुमाळ, बाळू बिडगर,प्रा उद्धव मुळे, चंद्रकांतआव्हाड, प्रकाश धुमाळ ,विकास बिडगर, गोविंद कुकर, सरवदे , जय मल्हार मित्र मंडळ परळी यांनी सर्व समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या रथयात्रेचा प्रवास पुढीलप्रमाणे आहे –
• २७ मे: माळेगाव, सांगवी, अहमदपूर, परचडा
• २८ मे: परळी, अंबाजोगाई, डिगोळांबा, चंदन सावरगाव, कुंबेफळ
• २९ मे: संत शिरोमणी मन्मथ स्वामी, श्रीक्षेत्र कपिलधार
• ३० मे: सोनेगाव फाटा, पाटोदा, बांगरवाडी, धनगर जवळका
• ३१ मे: हळगाव मार्गे श्रीक्षेत्र चौंडी येथे समारोप
यात्रेच्या संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, २७ मे रोजी रात्री ८ ते ९ दरम्यान श्री संत जगमित्र नागा मंदिर, परळी येथे ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे भक्तिरसपूर्ण हरिकिर्तन होणार आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून लोहा येथून निघणारी ही रथयात्रा पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभाव जपत काढण्यात येते.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त यंदा ही यात्रा अधिक उत्साह, सहभाग आणि भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
परळीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त दिंडी रथयात्रेचे २७ मे रोजी भव्य स्वागत
RELATED ARTICLES