प्रतिनिधी : सेंट्रल बँक ऑफिसर्स असोसिएशन तर्फे ऑल इंडिया सेंट्रल बँक ऑफिसर्स फेडरेशन चा ६० वा वर्धापन दिन नुकताच दादर येथे साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्मचारी व अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत लाडे यांचा बॅंकींग तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनरल मॅनेजर श्री. पॉप्पी शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छायाचित्रात डावीकडून श्री. अनिल ठाकूर, सरचिटणीस; श्री. मनोज वडनेरकर, अध्यक्ष; श्री. सूर्यकांत लाडे, जनरल मॅनेजर श्री पॉप्पी शर्मा आणि जनरल मॅनेजर श्री. व्ही. नटराजन यावेळी उपस्थित होते.श्री लाडे यांच्या या सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सूर्यकांत लाडे याचा बँकिंग व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सेंट्रल बँकेकडून सन्मान
RELATED ARTICLES